अनाथ बालकांसोबत दिवाळी साजरा करा; स्वयंसेवी संस्था व नागरिकांनी पुढाकार घ्या-जिल्हाधिकारी निमा अरोरा यांचे आवाहन


अकोला,दि.21(जिमाका)- महिला व बाल विकास विभागाअंतर्गत कार्यरत बालगृह, शिशुगृह, महिला राज्यगृहातील महिला व बालकांना दिवाळी सण साजरा करता यावा याकरीता जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था तसेच नागरिकांनी पुढाकार घेवून त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा करा, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले.

दिवाळी सण सर्वत्र मोठया उत्सवात साजरा केला जातो. हा उत्सव सर्वसाधारण नागरीकांप्रमाणे संस्थेतील महिला, बालके व भिक्षेकरी यांना साजरा करता यावा यासाठी जिल्ह्यातील स्वयंसेवी संस्था, पुढारी, अधिकारी, कर्मचारी व नागरिकांनी पुढाकार घेऊन त्यांच्यासोबत दिवाळी सण साजरा करावा. याकरीता संबधित महिला व बालविकास विभागांचे अधिकारी व संस्था अधिक्षक यांच्याशी संपर्क साधावा. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे(9860936943), जिल्हा परीविक्षा अधिकारी तथा अधिक्षक महिला राज्यगृह गिरीश पुसदकर(8329904312), जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूलकर(9421464566), शासकीय बालगृह जयश्री वाढे(8208977522), गायत्री बालिकाश्रम वैशाली भारसाकळे(9881477573), सुर्यादय बालगृह शिवराज खंडाळकर(9028233077) उत्कर्ष शिशुगृह प्रिती दांदळे(9767083536) यांच्या संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विलास मरसाळे यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ