उपप्रादेशिक परिवहन कार्यालय; वाहन नोंदणीकरीता शनिवार, रविवार सुट्टीच्या दिवशी सुरु


अकोला,दि.21(जिमाका)-  दिवाळी सणानिमित्त नवीन वाहनांची मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते. त्याअनुषंगाने नवीन वाहनांना पंसतीचा नोंदणी क्रमांक मिळून जनतेला वाहनाचा ताबा मिळावा याकरीता उप प्रादेशिक परिवहन कार्यालय शनिवार व रविवार दि. 22 व 23 ऑक्टोंबर रोजी सार्वजनिक सुटीच्या दिवशी सुरु राहिल, तरी नवीन वाहन खरेदीदाराने सार्वजनिक सुटीच्या दिवशी वाहन नोंदणी करुन घ्यावे, असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी केले आहे.

सार्वजनिक सुटीच्या दिवशी उप प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन नोंदणी, त्याअनुषंगिक कर वसूली व आवश्यक शासकीय फी स्विकारण्याचे कामकाजाकरीता कार्यालय सुरु राहिल. याकरीता मोटार वाहन निरीक्षक गजानन दराडे, मुख्य रोखपाल दिपक पोटे, सहायक रोखपाल मंगेश देशमुख यांची नेमणूक करण्यात आली आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ