निवृत्ती धारकांच्या समस्यांचे निराकरणाकरीता सुविधा केंद्रातील दुरध्वनी क्रमांक जारी


      अकोला, दि.11(जिमाका)-  निवृत्ती शासकीय कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्ती वेतन व राष्ट्रीय सेवा निवृत्ती वेतन योजना संबंधित येणाऱ्या अडचणी व समस्यांचे निराकरण करण्यासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाव्दारे सुविधा केंद्रातील दुरध्वनी क्रमांक जारी केला आहे. या सुविधेचा सर्व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी आपल्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा कोषागार अधिकारी मनजित गोरेगावकर यांनी केले आहे.

शासकीय कर्मचाऱ्यांना नियमित निवृत्ती वेतनासंबधीत उपदान, अंशराशीकरण व कुटूंब निवृत्ती वेतन संबंधित समस्या वा अडचणीसंबधित निराकरणासाठी जिल्हा कोषागार कार्यालयाच्या निवृत्ती वेतन शाखा येथील सुविधा केंद्रातील दुरध्वनी क्रमांक 0724-2420234 वर तसेच राष्ट्रीय सेवा निवृत्ती वेतन योजनेसंबधीत समस्यांकरीता 0724-2435254 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा कोषाागार अधिकारी यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम