डिजीटल आरोग्य कार्ड ‘आभा’ काढण्याचे आवाहन

अकोला,दि.१८(जिमाका)-  आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत  आयुष्यमान भारत डिजीटल आरोग्य कार्ड ‘आभा’ हे काढण्यात येत आहे. नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य संस्थेतून हे कार्ड मोफत काढून घ्यावे अथवा https://healthid.abdm.gov.in   लिंकवरुन स्मार्ट फोनच्या सहाय्याने काढून घ्यावे,असे आवाहन आरोग्य उपसंचालक अकोला मंडल अकोला तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले आहे. https://healthid.abdm.gov.in  लिंकवर स्मार्ट फोनच्या सहाय्याने आधार कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्सच्या सहाय्याने हे कार्ड स्वतःलाही काढता येईल. या आरोग्य कार्डात सर्व आरोग्य विषयक व्यक्तिगत संपूर्ण माहिती संरक्षीत असेल. देशातील कोणत्याही आरोग्य केंड्रात हेल्थ आयडी क्रमांकावरुन आरोग्यविषयक माहिती मिळू शकेल. तरी नागरिकांनी आपले आभा कार्ड काढून घ्यावे,असे आवाहन आरोग्य उपसंचालक अकोला मंडल अकोला तथा जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी केले आहे.

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ