पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा 603 उमेदवारांचा सहभाग; 292 जणांची प्राथमिक निवड










अकोला, दि.14(जिमाका):- जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या वतीने पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आज आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात 1024 पदांसाठी भरती प्रक्रिया राबविण्यात आली. त्यात प्रमुख 12 आस्थापनांनी सहभाग घेतला. भरती प्रक्रियेसाठी 603 उमेदवारांनी आपला सहभाग नोंदविला तर निवड प्रक्रियेनंतर 292  जणांची प्राथमिक निवड झाली,अशी माहिती जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त द.ल. ठाकरे यांनी दिली.

या मेळाव्यात 1)जस्ट डायल साठी मार्केटींग एक्झिक्युटीव्ह 30 पदे, 2) बीव्हीजी इंडीया लि. पुणे 175, 3) महिंद्रा ॲण्ड महिंद्रा औरंगाबाद करीता  प्रशिक्षणार्थी 250 पदे, 4) बडवे इंजिनिअरींग लि. औरंगाबाद 280 पदे, 5) परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा. लि. औरंगाबाद 10 पदे, 6)वायबर्नेट इंटरनेट सर्व्हिसेस प्रा. लि. 15 पदे, 7) भारतीय जीवन बिमा निगम अकोला 30 पदे, 8) निर्माण मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी अकोला 20 पदे, 9) क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अकोला करीता 14 पदे, 10) फ्लिपकार्ट नागपूर करिता 30 पदे, 11) पीजी इलेस्टोप्लास्ट अहमदनगर करिता 120 पदे, 12) सीआरटी औरंगाबाद करीता 50 पदे असे एकूण 1024 पदांच्या भरतीचे नियोजन करण्यात आले होते. या मेळाव्यात जिल्ह्यातील 603 उमेदवारांनी सहभाग नोंदविला.  त्यात 292 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे.

जिल्हा प्रशासनातर्फे दर महिन्यात रोजगार मेळाव्याचे आयोजन केले जाते. उमेदवारांकरीता रोजगार मेळाव्यात ठिकाणीच नोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली होती. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा समन्वय शैक्षणिक गुणवत्ता कक्षाचे गजानन महल्ले यांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले. तसेच जिल्हा रोजगार स्वयंरोजगार व कौशल्य विकास विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ