कोविडःआरटीपीसीआर चाचण्यात दोन पॉझिटिव्ह, चार डिस्चार्ज


 अकोला दि.11(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 74 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोघांचा  अहवाल पॉझिटीव्ह आला. तर चार जणांला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 2 व खाजगी 0)2+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 2.

आरटीपीसीआर ‘दोन

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात दोघांचा अहवाल  पॉझिटीव्ह आला. त्यात एक पुरुष व एका महिलेचा समावेश असून हे रुग्ण मुर्तिजापूर व पारस येथील प्रत्येकी एक प्रमाणे रहिवाशी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

चार डिस्चार्ज

आज दिवसभरात चार जणांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘21

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65951(49818+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 21 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील सात रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 14 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

                                                              000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ