जिल्हास्तरीय रायफल शुटींग क्रीडा स्पर्धांना प्रारंभ

 



अकोला,१३ दि.(जिमाका)-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय व जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा संकूल व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हास्तर शालेय रायफल शुटींग क्रीडा स्पर्धांचा प्रारंभ झाला असून  दि.१४ पर्यंत या स्पर्धा सुरु राहणार आहेत, असे जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांनी कळविले आहे.

येथील शिवमंगल हॉल, श्री शिवाजी इंग्लिश प्रायमरी स्कूल अकोला येथे बुधवारी (दि.१२) या स्पर्धांना प्रारंभ करण्यात आला.  यावेळी विलास हरणे, मुख्याध्यापक विजय ठोकळ,  मुख्याध्यापक वैशाली शेळके, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्पलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या स्पर्धांसाठी पंच म्हणून विन्सेंट आमेर, अक्षय यन्नावार, निर्मल नरवाडे, अनिल जाधव, राधिका बढे, प्रथमेश राऊत हे काम पहात आहेत. स्पर्धांचे आयोजनासाठी युवराज उके, मोहित लांडे, हर्ष जाधव, मायकल अमेर हे परिश्रम घेत आहेत.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ