आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजना; भुमिहीन आदिवासी लाभार्थांना मिळणार जमीन


अकोला दि.20(जिमाका)-  एकात्मिक  आदिवासी विकास प्रकल्प, अकोला यांच्या कार्यक्षेत्रातील ‍जिल्हा  वार्षिक आदिवासी घटक कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील भुमिहीन दारीद्रय रेषेखालील आदिवासी लाभार्थांना आदिवासीचे सबळीकरण व स्वाभिमान योजनेतंर्गत चार एकर जिरायती किंवा दोन एकर बागायती जमीन  मिळणार आहे. जमीन खरेदीसाठी शेत जमीन मालकांकडुन शेत जमीन विक्रीचा प्रस्ताव दि. 18 नोव्हेंबरपर्यंत कार्यालयीन वेळेत सादर करावा. छापील योजनेचा अर्ज आदिवासी विकास प्रकल्प येथे विनामुल्य शेतजमीन मालकांना देण्यात येईल. पात्र व इच्छुक शेतकरी मालकांनी योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन एकात्मिक  आदिवासी विकास विभागाचे प्रकल्प अधिकारी यांनी केले.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ