कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘एक’ पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज
अकोला दि.28(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे (आरटीपीसीआर) 51 अहवाल प्राप्त
झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज
देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी
0)1+रॅपिड ॲन्टीजेन
चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.
आरटीपीसीआर ‘एक’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह
आला. त्यात एका पुरुषाचा समावेश असून हा रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील रहिवासी आहे,
अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
दोन डिस्चार्ज
आज दिवसभरात दोन
रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय
रुग्ण ‘सहा’
जिल्ह्यात एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65974(49841+15142+991)आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात सहा सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील एक रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर पाच जणांवर होम आयसोलेशन
मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा