डाक विभाग;जागतिक टपाल दिनानिमित्त विविध कार्यक्रम


अकोला, दि.8(जिमाका)- भारतीय डाक विभागाद्वारे दि. 9 ऑक्टोबर हा दिवस जागतिक टपाल दिन म्हणून साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय पातळीवर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्या अनुषंगाने अकोला डाक विभागाद्वारे दि. 9 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाचे प्रवर अधिक्षक यांनी केले आहे.

कार्यक्रम याप्रमाणे : रविवार दि. 9 ऑक्टोंबर रोजी अकोला डाक विभागातील डाकघरामध्ये प्रभातफेरी, वृक्षरोपण व सर्व कार्यालयाच्या आतील व बाहेरिल परिसराची स्वच्छता अभियान.

सोमवार दि.10 रोजी वित्तीय  समावेशन  दिवस अकोला  प्रधान  डाकघर  येथे  डायरेक्ट  एजंट MPKBYSAS एजंट्सची आढावा बैठक, प्रश्नमंजुषा कार्यक्रम व उत्कृष्ट कार्याबद्दल कर्मचाऱ्यांचा सत्कार, टपाल जीवन विमा पॉलीसी धारकांच्या मॅच्युरिटी दावेदारांना चेकचे वितरण आणि डब्ल्युसीटीसी अकोला येथे मुलीना नवीन सुकन्या समृद्धी खात्यांच्या पासबुकचे वितरण.

मंगळवार दि. 11 रोजी फिलाटेली दिनानिमित्त डाक विभागातील शाळांमध्ये फिलाटेली छंद म्हणून कार्यशाळा, फिलाटेली दिनानिमित्त स्पेशल कॅन्सेलेशन चे प्रकाशन व शाळांमध्ये फिलाटेलिक क्विझ स्पर्धा.

बुधवार दि. 12 रोजी टपाल व पार्सल दिवसानिमित्त प्रवर अधिक्षक डाकघर यांचे कार्यालय येथे ग्राहकांची व  विभागीय पोस्टमन, एबीपीएम यांच्यासोबत आढावा बैठक.

गुरुवार दि. 13 रोजी अंत्योदय दिवसानिमित्त सहाय्यक डाक अधिक्षक यांचे द्वारे पीएमएसबीवाय, पीएमजेजेबीवाय व एपीवाय योजनांच्या संदर्भात अकोला डाक विभागात तालुका पातळीवर शिबिर, सर्व  पात्र  जनतेला  सामाजिक  सुर क्षेमध्ये कव्हर करण्यासाठी ऑटो किंवा ट्रक चालक संघटना तसेच भाजी मंडीतील कामगारांसोबत बैठक तसेच आधार  नोंदणी  व अपडेटिंग शिबिरांचे आयोजन.

            भारतीय डाक विभागाद्वारा देण्यात येणाऱ्या विविध अल्प बचत योजनावर व्याज दरात वाढ करण्यात आली आहे. डाक सप्ताहात विविध सेवांचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन डाक विभागाचे प्रवर अधिक्षक यांनी केले आहे.

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ