महाराष्ट्र लोकसेवा आयोग; शनिवारी(दि.5) गट क सेवा संयुक्त पुर्व परिक्षाचे आयोजन


अकोला,दि.20(जिमाका)- महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे शनिवार दि. 5 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यातील 16 उपकेंद्रावर सकाळी 11 ते 12 या वेळेत महाराष्ट्र लोकसेवा आयोग क सेवा संयुक्त पुर्व परिक्षा-2022 चे आयोजन होणार आहे. परिक्षा केंद्रावर गैरप्रकार, कायदा व सुव्यवस्था निर्माण होवू नये व परिक्षा शांततेत पार पाडण्याकरिता दि. 5 नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते रात्री आठवाजेपर्यंत परीक्षा केंद्राच्या आतील संपुर्ण परिसरात व केंद्राचे बाहेरिल लागून असलेल्या 100 मीटर परिसरात कलम 144 अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहे.

दुय्यम सेवा संयुक्त पुर्व परिक्षा उपकेंद्र याप्रमाणे :

(1)   शिवाजी आर्ट, कॉमर्स ॲन्ड सायन्स कॉलेज, मार्णा बिल्डींग, शिवाजी पार्क, अकोट रोड, अकोला

(2)    खंडेलवाल ज्ञानमंदिर कॉन्व्हेन्ट, विजय हाऊसिंग सोसायटी, गोरक्षण रोड, अकोला

(3)    जागृती विद्यालय व उच्च माध्य विद्यालय, रणपीसे नगर, अकोला

(4)   सिताबाई कला महाविदयालय, सिव्हील लाईन रोड, अकोला

(5)    भारत विदयालय, तापडीया नगर, अकोला

(6)  श्री शिवाजी हायस्कूल, मुख्य शाखा देशमुख पेठ, शिवाजी पार्कजवळ, अकोट रोड, अकोला

(7)  भिकमचंद खंडेलवाल विद्यालय, गोडबोले प्लॉट डाबकी रोड, जुने शहर, अकोला

(8)  गुरूनानक विद्यालय, गांधीनगर, सिधी कॅम्प अकोला

(9)  होलीक्रॉस कॉन्व्हेंट, जठारपेठ चौक अकोला

(10)  ज्युबिली इंग्लिश हायस्कूल/ ज्युनिअर कॉलेज, रामदासपेठ पोलीस स्टेशन जवळ अकोला

(11)  न्यु इंग्लिश हायस्कूल, शिक्षण संकूल रामदासपेठ पोलीस स्टेशन जवळ अकोला

(12)  एल.आर.टी.कॉलेज ऑफ कॉमर्स, रतनलाल प्लॉट, सिव्हील लाईन, नकलेस रोड, अकोला

(13)  श्रीमती मोहरीदेवी खंडेलवाल विदयालया, गोडबोले प्लॉट, डाबकी रोड जुने शहर, अकोला

(14)  डि. ए. व्ही. कॉन्व्हॅट स्कूल, महात्मा गांधी रोड, अकोला

(15)  मनुताई कन्या शाळा, तिलक रोड सिटी कोतवाली पोलीस स्टेशन जवळ,अकोला

(16)  एन.व्ही.व्ही. स्वावलंबी विद्यालय आणि राधाकृष्ण शुक्ल उच्च माध्यमिक शाळा/ महाविद्यालय मुख्य पोस्ट ऑफिस मागे, अकोला

परिक्षा केंद्रावर प्रतिबंधात्मक उपाययोजना

परिक्षा केंद्राच्या परिसरात प्रवेश करतेवेळी  पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रितरित्या प्रवेश करता येणार  नाही, कोणत्याही प्रकारच्या घोषणा देता येणार नाही. परिक्षा केंद्रावर प्रवेश करणाऱ्या सर्व परिक्षार्थी, अधिकारी, कर्मचाऱ्यांचे थर्मल, इफ्रारेड थर्मामिटरद्वारे तापमान तपासण्यात येईल. सर्व पर्यवेक्षकांची रॅपिड ॲन्टिजेन टेस्ट करणे अनिवार्य राहिल. परिक्षा केंद्राच्या परिसरात परिक्षार्थी अथवा अन्य व्यक्तींकडून शांततेत बाधा निर्माण होईल असे कोणतेही कृत्य करण्यात येणार नाहीत. परिक्षा केंद्राच्या 100 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर, फॅक्स मशीन, पानपट्टी, लॅपटॉप, टायपिंग सेंटर एसटीडी बुथ, ध्वनीक्षेपक इत्यादी माध्यम परिक्षा संपेपर्यंत बंद ठेवण्यात येईल.   परिक्षा केंद्राचे परिसरात इंटरनेट, मोबाईल, फोन, सेल्युलर, प्लॅन ई-मेल व इतर प्रसार माध्यमे घेवून प्रवेश करण्यात मनाई राहील. परिक्षा केंद्रावर कोणत्याही अनाधिकृत व्यक्ती, वाहनास प्रवेशास मनाई राहील. वरील प्रतिबंधात्मक आदेश परिक्षा केंद्रावर नियुक्त अधिकारी, कर्मचारी, परिक्षार्थी तसेच परिक्षा केंद्रावर देखरेख करणारे अधिकृत अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांचे बाबत परिक्षा संबंधीत कर्तव्य पार पाडण्याचे दृष्टीने लागू राहणार नाहीत, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी  कळविले आहे.

0000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ