शोध व बचाव पथकाचे कौलखेड येथे मॉक ड्रिल






      अकोला, दि.12(जिमाका)-  जिल्हाधिकारी कार्यालय व एनडीआरएफ पथक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे सातत्यपुर्ण प्रशिक्षण व क्षमतावर्धनासाठी आज(दि.12) कौलखेड येथील मोर्णा नदीकाठी मॉक‍ ड्रिल व प्रात्यक्षिक घेण्यात आले. यामध्ये पुरस्थितीमध्ये अडकलेल्या नागरिकांची सुटका व बचाव कार्य तसेच नागरीकांच्या बचावासाठी गेलेल्या बोटचा झालेला अपघात व त्यांचा दुसऱ्या पथकाने केलेला यशस्वी बचावाबाबत प्रात्यक्षिक व मॉक ड्रिल घेण्यात आले. या मॉक ड्रिलमध्ये  शोध बचाव पथक सदस्य, पोलिस, होमगार्डचे स्वयंसेवी संस्था प्रतिनिधी, एन.एस.एस. विद्यार्थी यांनी भाग घेतला. यावेळी एन.डी.आर.एफ पथकाचे कमान्डट बिपीन बिहारी सिंग, शरद ढोरे, संजय पतले, विनोद गावंडे, प्रविण गावित यांनी 20 लोकांच्या पथकांना मार्गदर्शन व प्रात्यक्षिक घेतले. तर मॉक ड्रिल यशस्वी करण्यासाठी संदीप साबळे, सुनिल कल्ले, हरीहर निमंकडे, सुधीर कोहचाळै, प्रा. संकेत झाल्टे, प्रशांत सायरे, अतुल वाहनखडे, सचिन चिकार, पी.एस. दामोदर, दत्तु जुमडे यांनी प्रयत्न केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ