टपाल सप्ताह; डाक विभागातील योजना नागरिकांपर्यत पोहोचवा



अकोला, दि.11(जिमाका)- भारतीय डाक विभागाद्वारे जागतिक टपाल दिनानिमित्त राष्ट्रीय पातळीवर दि. 9 ते 13 ऑक्टोंबर दरम्यान टपाल सप्ताहाचे आयोजन करण्यात़ येत आहे. त्याअनुषंगाने सोमवारी (दि.10) अकोला मुख्य डाकघर येथे सकाळी 11 वाजता जिल्ह्यातील सर्व डायरेक्ट एजंट, एमपीकेबीआय, एसएएस एजंट आणि विभागीय कर्मचाऱ्यांचे आढावा घेऊन मार्गदर्शन केले. तसेच डाक विभागाव्दारे दिल्या जाणाऱ्या सेवा व योजनाची माहिती नागरिकापर्यंत पोहोचवा, असे आवाहन डाक विभागाचे प्रवर अधिक्षक संजय आखाडे यांनी केले.

टपाल सप्ताहानिमित्त आज डाक कार्यालयात वित्तीय समावेशन दिवस साजरा करण्यात आले. त्यानंतर जेष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे यांनी डाक विभागाच्या  कार्याचे गौरव  करून  भावी  काळात  अशीच  सेवा  अविरत  करीत  राहील,  असे  मनोगत व्यक्त  केले. यावेळी  जेष्ठ  पत्रकार  संजय  देशमुख  उपस्थित  होते.

सहाय्यक अधिक्षक सुनील हिवराळे यांनी उपस्थित सर्व अभिकर्त्यांची डाक विभागाच्या विविध योजनाबाबतची प्रश्न मंजुषा घेतली. तसेच चालू आर्थिक वर्षात  उत्कृष्ट कामगिरी केलेल्या उपडाकडाकपालशाखा डाकपाल यांना बक्षीस वितरण करण्यात आले.  त्यामध्ये अकोला डाक विभागातील शाखा डाकपाल कुलदीप माळी सुधीर मेतकर दिपाली कोल्हे,  ज्ञानदेव भालेरावअविनाश सावसुंदर,  श्रीमती देविका देशमुखउपडाकपाल श्रीमती राजश्री कुलकर्णी श्रीमती बबिता देहणकर यांना सर्वाधिक बचत बँक तथा सुकन्या समृद्धी नवीन खाते उघडल्याबद्दल गौरविण्यात आले. डाक सहाय्यक उमर चौधरी, दिलीप नालदे, पोस्टमन गजानन राऊत, शाखा डाकपाल संजय भोयर, डाक सेवक गोपाल यमतकर,  शाखा डाकपाल संतोष लोखंडे यांना टपाल जीवन विमा व ग्रामीण टपाल जीवन विमा मधील उत्कृष्ट कामगिरी बद्दल पुरस्कृत करण्यात आले. प्रश्न मंजुषाकरिता विद्या नानोटीराहील बोंडे आणि सतीश निकुंभ यांना मान्यवरांचे हस्ते पारितोषिक देवून गौरविण्यात आले. डाक विभागाद्वारे संचालित टपाल जीवन विमाचे मुदतअंती रकमेच्या धनादेशाच्या वितरण व नवीन प्रस्ताव धारकांना त्यांचे पॉलीसीचे वितरण करण्यात आले. या प्रसंगी ‘फिराव’ या लघु चित्र फितीतील नायक प्रमोद बिहाडेत्यांचे कुटुंब प्रशांत नागलेआकाश वानखडे व संपूर्ण टीमचा मान्यवरांच्या हस्ते गौरव  करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्र संचालन कार्यालय सहायक दिपक पाथरकर तर आभार प्रदर्शन सहाय्यक अधिक्षक नीलकंठ बावस्कर यांनी केले. कार्यक्रमाकरिता डाक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ