नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन; शोध व बचाव पथकाचे प्रशिक्षण



      अकोला, दि.11(जिमाका)-  जिल्हाधिकारी कार्यालय व एनडीआरएफ पथक पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आपत्ती व्यवस्थापन शोध व बचाव पथकाचे सातत्यपुर्ण प्रशिक्षण व क्षमतावर्धनासाठी आज(दि.11) आरएलटी महाविद्यालय, अकोला येथे प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले. या प्रशिक्षणामध्ये महसुल, पोलिस, होमगार्ड, पाटबंधारे विभाग, आरोग्य विभाग, अग्निशमन विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, स्वयंसेवी संस्था इत्यादी विभागाचे प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते. तसेच एमएफआर शोध व बचावामध्ये विविध विभागाचे प्रथमोपचार या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एनडीआरएफ पथकाचे कमान्डट बिपीन बिहारी सिंग, शरद ढोरे, संजय पतले, विनोद गावंडे, प्रविण गावित व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम