खाजगी प्रवासी बसेस यांनी शासनाच्या दराप्रमाणे भाडे आकारावे


अकोला,दि.21(जिमाका)- महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने टप्पा वाहतुकीचे सद्यस्थितीचे  भाडेदर विचारात घेऊन खाजगी बससाठी येणाऱ्या प्रति कि. मी. भाडेदराच्या 50 टक्के पेक्षा अधिक राहणार नाही, असे कमाल भाडेदर शासनाने शासन निर्णय दि. 27 एप्रिल 2019 नुसार निश्चित केले आहेत. त्याअनुषंगाने आगामी सण उत्सव कालावधीत खाजगी बस मालकांकडून शासनाने निश्चित केलेल्या प्रति कि. मी. भाडे आकारण्यात येऊ नये असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अकोला यांनी केले आहे. तसेच बस संचालकांनी आकारावयाचे महत्तम भाडे विहीत नमुन्यात तक्ता करुन दर्शनी भागास लावण्यात यावा. खाजगी वाहतुकदारांनी निर्धारित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दर आकारल्यास वाहतुकदारांवर कारवाई करण्यात येईल. जास्तीचे भाडे घेतल्यास प्रवाश्यांनी योग्य पुराव्यासह                                       dyrto.30-mh@gov.in येथे रितसर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात येत आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ