जिल्हास्तर मनपा क्षेत्र व अकोला ग्रामीण जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धा सोमवार (दि.17) पासुन

 अकोला,दि.12(जिमाका)क्रीडा    युवक   सेवा  संचालनालय  महाराष्ट्र  राज्य,पुणे    जिल्हा  क्रीडा  अधिकारी  कार्यालय, अकोला यांच्यामार्फत   जिल्हास्तर   मनपा   क्षेत्र   अकोला  ग्रामीण  क्षेत्र  जिल्हास्तर  शालेय  बास्केटबॉल,  टेबलटेनिस  खेळाचे आयोजन सोमवार दि.17 पासून करण्यात आले आहे. अकोला  येथील   न्यु इंग्लीश  हायस्कुल येथे क्रीडा स्पर्धा तर [DA1] योगा  स्पर्धा  ऑफिर्सस  क्लब  अकोला  येथे  होणार  आहेत.

 

स्पर्धांचे वेळापत्रक या प्रमाणे-

 

अकोला मनपा क्षेत्र जिल्हास्तर बास्केटबॉल क्रीडा स्पर्धा

14 वर्षाआतील मुले  मुली दि.17 ऑक्टोंबर, 17 वर्षाआतील मुले  मुली दि.18रोजी,19 वर्षाआतील मुले  मुली दि.19 रोजी

अकोला ग्रामीण क्षेत्र जिल्हास्तर शालेय बास्केटबॉल स्पर्धा

14,17,19 वर्षाआतील मुले  मुली सर्व गटाचे आयोजन दि.19रोजी,बास्केटबॉल खेळाच्या प्रवेशाची अंतिम दि.15 आहे.

 अकोला मनपा क्षेत्र  अकोला ग्रामीण क्षेत्र जिल्हास्तर टेबलटेनिस क्रीडा स्पर्धा

14,17,19 वर्षाआतील मुले दि.19रोजी, 14,17,19 वर्षाआतील मुली दि.20रोजी. टेबल  टेनिस खेळाच्या प्रवेशाची अंतिम दि. 17 रोजी आहे.

अकोला मनपा क्षेत्र जिल्हास्तर योगासन क्रीडा स्पर्धा

14,17,19 वर्षाआतील मुले  मुली दि.21 रोजी

अकोला ग्रामीण क्षेत्र जिल्हास्तर योगासन क्रीडा स्पर्धा

14,17,19 वर्षाआतील मुले  मुली दि.22 रोजी.

योगासन खेळाच्या प्रवेशाची अंतिम दि.18 आहे. याप्रमाणे होणाऱ्या अकोला मनपा क्षेत्र  अकोला ग्रामीण क्षेत्र जिल्हास्तर स्पर्धामध्ये विहित वेळेत संघाची नोंदणी करुन शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी  चंद्रकांत उप्पलवार यांनी केले आहे.


 [DA1]

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ