कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘दोन’ पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज
अकोला दि.29(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे (आरटीपीसीआर) 75 अहवाल प्राप्त
झाले. त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर तिघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 2 व खाजगी
0)2+रॅपिड ॲन्टीजेन
चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 2.
आरटीपीसीआर ‘दोन’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात दोघांचा अहवाल
पॉझिटीव्ह
आला. त्यात एक महिला व एक पुरुषाचा समावेश असून हे रुग्ण अकोला मनपा क्षेत्रातील
रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
तीन डिस्चार्ज
आज दिवसभरात तीन
रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय
रुग्ण ‘पाच’
जिल्ह्यात एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65976(49843+15142+991)आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात पाच सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील एक रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर चार जणांवर होम आयसोलेशन
मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा