कोविडःआरटीपीसीआर चाचण्यात एक पॉझिटिव्ह, दोन डिस्चार्ज
अकोला दि.16(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 59 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोन जणांला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1 व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह
1.
आरटीपीसीआर ‘एक’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एका महिलेचा समावेश असून हा रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील रहिवासी
आहे,
अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
दोन डिस्चार्ज
आज दिवसभरात दोन जणांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय
रुग्ण ‘16’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 65958(49825+15142+991) आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 16 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील पाच रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 11 जणांना होम आयसोलेशन मध्ये
उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा