शासकीय महिला राज्यगृह बनले लग्नघर; ज्योती आज (दि.७) होणार विवाहबद्ध


अकोला, दि.६(जिमाका)-  येथील शासकीय महिला राज्यगृहात राहणारी ज्योती रामचंद्र ही युवती शुक्रवार दि.७ रोजी बुलडाणा येथील परमेश्वर बोरुडे या युवकाशी विवाहबद्ध होऊन वैवाहिक जिवनात पदार्पण करणार आहे. या विवाह सोहळ्यासाठी शासकीय महिला राज्यगृह  आणि विवाहस्थळ असलेले उत्कर्ष शिशुगृह व गायत्री बालिकाश्रम या वास्तुंना लग्नघराचे स्वरुप आले आहे.

 शासनाच्या महिला व बालविकास अधिकारी यांच्या कार्यालयाअंतर्गत  शासकीय महिला राज्य गृह ही संस्था कार्यरत आहे. या संस्थेत राहणारी ज्योती रामचंद्र ही युवती  बुलडाणा येथील परमेश्वर याच्याशी विवाहबद्ध होत आहे. हा विवाह उत्कर्ष शिशुगृह, गायत्री बालिकाश्रम येवता रोड मलकापूर अकोला येथे शुक्रवार दि. ७ रोजी सकाळी ११ वाजता होणार आहे. हा विवाहसोहळा पार पाडण्यासाठी उत्कर्ष शिशुगृह , गायत्री बालिकाश्रम, रोटरी क्लब ऑफ अकोला ईस्ट, जयेशभाई शहा, ओम शिवज्वेलर्स, संकल्प मित्र परिवार प्रतिष्ठा  आणि शासनाचा महिला व बालविकास विभाग परिश्रम घेत आहेत.    

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना