एकविधी खेळ संघटनाकडून जिल्हास्तर शालेय क्रीडा स्पर्धाकरीता अर्ज मागविले

 

      अकोला,दि.22(जिमाका)- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांचेमार्फत ‍जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा कार्यालय, अकोला यांच्या संयुक्त विद्यमाने सन 2022-23 या शैक्षणीक  वर्षाकरीता विविध खेळाकरीता शालेय क्रीडा स्पर्धा आयोजन करण्यात आले आहे. त्यात आष्टे डू आखाडा, युनिफाईट, कुडो, स्पिडबॉल, तेंगसुडो, फिल्ड आर्चरी, मॉन्टेक्स बॉल क्रिकेट, मिनी गोल्फ, सुपर सेवन क्रिकेट, बेल्ट रेसलिंग, फ्लोअर बॉल, थायबॉक्सींग, हाफ किडो बॉक्सींग, रोप स्किपींग, सिलंबम, वुडबॉल, टेनिस व्हॉलीबॉल , थांगता मार्शल आर्ट, कुराश, लगोरी, रस्सीखेच, पॉवरलिफटींग, बिच व्हॉलिबॉल, टार्गेटबॉल, टेनीस क्रिकेट, जित कुने डो, फुटसाल, कॉर्फबॉल, टेबल सॉकर, हुप क्वॉन दो, युग मुन दो, वोवीनाम, ड्रोप रो बॉल, ग्रॅपलींग, पेंटाक्यू, लंगडी, जंपरोप, स्पोर्ट डान्स, चॉकबॉल, चॉयक्वांदो, फुटबॉल टेनीस, बुडो, म्युजिकल चेयर, टेनिसबॉल क्रिकेट या खेळाकरीता दि. 7 नोव्हेंबरपर्यंत सर्व एकवीध खेळ संघटनांनी राज्य संघटना सलग्नता प्रमाणपत्र व जिल्हा संघटना नोंदणी प्रमाणपत्र या कार्यालयात कार्यालयीन वेळेत सादर करावे, असे जिल्हा  क्रिडा ‍अधिकारी चंद्रकांत दप्पलवार यांनी कळविले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ