स्नानकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था येथे वक्तृत्व स्पर्धा




अकोला दि.21(जिमाका)-  स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्त आकाशवाणी केंद्र आणि स्नानकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन युवकांसाठी "एअरनेक्स्ट शोध नव्या आरजे" ही वक्तृत्व स्पर्धा बुधवारी(दि.19) स्नानकोत्तर पशुवैद्यक आणि पशुविज्ञान संस्था, अकोला येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत पदव्युत्तर विद्यार्थीनी डॉ. शरयू शिंगारे आणि डॉ. अबोली कथे यांनी ‘आरजे’ चा मान पटकावला. तसेच आत्मनिर्भर भारत आणि श्वेत क्रांती या विषयावर विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. तर डॉ. दिघे आणि डॉ. कुलदीप देशपांडे यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. यावेळी संस्थेचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. धनंजय दिघे, कार्यक्रम अधिकारी विजय दळवी, सहायक अभियंता श्रीकांत गावंडे, प्रसारण अधिकारी सुरज गोळे, उद्घोषक समीर शिरवळकर, पदव्युत्तर विद्यार्थी आणि प्राध्यापक आदि उपस्थित होते. तसेच डॉ. प्रवीण बनकर, डॉ. श्याम देशमुख आणि डॉ. रत्नाकर राऊळकर यांनी विशेष परीश्रम घेतले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ