गांधीग्राम पूल रहदारीसाठी बंद; पर्यायी मार्गावरुन वाहतुक

 अकोला,दि.१८(जिमाका)- गांधीग्राम येथील जुन्‍या पुलाला तडा गेल्‍यामुळे त्‍यावरील वाहतूक संपुर्णपणे बंद करण्यात आली आहे. हा पूल तातडीने दुरुस्त करुन वाहतुकीसाठी पुर्ववत खुला होईपर्यंत  अकोला – अकोट रहदारीकरीता पर्यायी मार्ग म्‍हणून अकोला – म्‍हैसांग – सासन (किनखेड दहीहांडा राज्‍य मार्गास जोडणारा) व अकोला – म्‍हैसांग – दर्यापूर – अकोट राज्‍य मार्ग वळविण्‍यात आला असल्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी निर्गमित केले आहेत.

 या संदर्भात कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार ही रहदारी वळविण्यात आली आहे. या आदेशान्वये अकोला ते अकोट रहदारीसाठी पर्यायी मार्ग म्‍हणून अकोला – म्‍हैसांग – सासन (किनखेड दहीहांडा राज्‍य मार्गास जोडणारा) व अकोला – म्‍हैसांग – दर्यापूर – अकोट या मार्गे वळविण्यात आली आहे. गांधीग्राम येथील पुल दुरुस्तीसाठी बंद करण्यात आला असल्याचे आदेशात म्हटले आहे.

०००००

           

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ