औद्योगिक प्रशिक्षण संस्था येथे अप्रेंटीसशीप मेळावा; 70 प्रशिक्षणार्थ्यांची प्राथमिक निवड



अकोला, दि.10(जिमाका)- शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, अकोला येथे प्रधानमंत्री राष्ट्रीय अप्रेंटीशीप मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. या मेळाव्यात संस्थेतील विविध व्यवसायाच्या एकूण 103 प्रशिक्षणार्थ्यांनी सहभाग नोंदवला. त्यात 70 प्रशिक्षणार्थ्यांची धूत ट्रान्समिशन कंपनी, संभाजीनगर येथे प्राथमिक स्वरूपात निवड करण्यात आले. या मेळाव्यात वेरॉक कंपनी लिमिटेड, धूत ट्रान्समिशन कंपनी लिमिटेड तसेच अकोला येथील उत्कर्ष कंपनी सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड व श्री इन्फोटेक कंपनी लिमिटेड यांच्या या कंपन्यांच्या प्रतिनिधींनी सहभाग घेतला. भरती मेळावा यशस्वी करण्यासाठी कनिष्ठ सहाय्यक प्रशिक्षणार्थी सल्लागार एस. बी. घोंगडे, गटनिदेशक रणजीत महल्ले, एस. एस. कलोरे, सागर पवार, शंतनू वानखेडे, आर.एन.गिरी, पी.एम.पाटील यांनी परिश्रम घेतले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ