जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त जनजागृती






      अकोला, दि.10(जिमाका)- जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयामार्फत जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त विविध कार्यक्रमाव्दारे जनजागृती करण्यात आले. त्याअनुषंगाने आज(दि.10) जिल्हा प्रशिक्षण केंद्र, अकोला येथे पोस्टर प्रदर्शनीव्दारे मानसिक आरोग्य विषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे यांनी आयुषात येणाऱ्या तणावाला कसे सामोरे जायचे याबाबत मार्गदर्शन केले.  

जागतिक मानसिक आरोग्य दिन दरवर्षी दि. 10 ऑक्टोंबर रोजी साजरा करण्यात येतो. यावर्षी ‘सर्वांसाठी मानसिक आरोग्य आणि कल्याण प्राथमिकता तुमची आमची नव्हे तर सर्वांची’ या थीमनुसार साजरी करण्यात येत आहे. हा कार्यक्रम जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. तरंगतुषार वारे, वैद्यकीय अधिक्षक डॉ. आरती कुलवाल, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. धनंजय चिमणकर, कार्यक्रम अधिकारी डॉ. हर्षल चांडक व श्रेय अग्रवाल यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी डॉ. हर्षल चांडक यांनी वाढत्या मानसिक आजाराबाबत व निद्रानाश आणि बदलत्या जीवनशैलीबाबत प्रास्ताविकातून माहिती दिली. तर डॉ. श्रेय अग्रवाल यांनी तनावामुळे वाढणारे हृद्य रोग व मधुमेह बाबत माहिती दिली. डॉ. आरती कुलवाल यांनी कामामुळे येणाऱ्या तनावाबाबत मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा स्त्री रुग्णालयातील परिचारिका व विद्यार्थ्यांनी पथनाटयव्दारे जनजागृती केली. मानसिक रुग्णांवर म्युझिक थेरॅपीव्दारे प्रात्यक्षिक सोहम रुतेला यांनी उपस्थितीतांना करुन दाखविली.

जागतिक मानसिक आरोग्य दिनानिमित्त पोस्टर प्रदर्शन आयोजन करण्यात आले. या प्रदर्शनीत प्रथम क्रमांक कु. नैना सरदार, व्दितीय कु. साक्षी तायडे व रितेश गवई तर तृतीय प्रिती ठाकूर यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच मानसिक आरोग्यात उत्कृष्ट कामगिरीबाबत आशा स्वयंसेविका कविता मनवर व आशा समुह संघटक तेल्हारा  विभागाचे रमन लोखंडे व मुर्तिजापूर विभागाचे प्रशांत काळे यांचे यावेळी सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालक प्रदिप इंगोले तर आभार प्रदर्शन अशोक जाधव यांनी केले. तसेच कार्यक्रम यशस्वीकरीता  डॉ. फरीदा अहसन, डॉ. प्रिती कोगदे, ॲड. शुभांगी ठाकरे, सोपान अंभोरेख्‍ सय्यद आरीफ, रिना चोंडकर, कविता रिठ्ठे, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी, जिल्हा स्त्री रुग्णालयातील परिचारिका यांनी परिश्रम घेतले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ