गांधीग्राम पूलावरुन पायदळ वाहतूकीस सशर्त परवानगी


      अकोला दि.27(जिमाका)-  गांधीग्राम येथील जुन्‍या पुलाला तडा गेल्‍यामुळे त्‍यावरील वाहतूक संपुर्णपणे बंद करण्यात आली होती. या संदर्भात आज आढावा बैठकीत कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग अकोला यांनी प्रस्तावित केल्यानुसार अकोट रोडवरील गांधीग्रामजवळील पुर्णा नदीवरील पुलावरून 15-20 लोकांना टप्प्या टप्‍याने केवळ पायी चालण्याच्या वाहतुकीस पाच दिवसाकरीता अटीशर्तीसह सुरु करण्याचे आदेश जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आज निर्गमित केले आहेत.

आदेशात म्हटल्याप्रमाणे, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम अकोला यांनी कठडे लावून बॅरेकॅटींग करावी. वाहतुक यंत्रणा सुरळीत करण्‍यासाठी पोलीस विभागाकडुन पुरेसा पोलीस बंदोबस्‍त ठेवण्‍यात येईल. तसेच कार्यकारी अभियंता यांनी पुलाचे दररोज निरीक्षण करुन तसा अहवाल चार दिवसात सादर करावा, असे आदेशाव्दारे कळविण्यात आले आहे. या संदर्भात आज जिल्हाधिकारी यांच्या दालनात आमदार रणधीर सावरकर यांच्या उपस्थितीत बैठक झाली होती. या बैठकीस संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ