पंचायत समिती सभापती पद आरक्षण सोडत गुरुवारी(दि.13)


अकोला, दि.11(जिमाका)- अकोला जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षणाची सोडत गुरुवार दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता होणार आहे, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी कळविले आहे.

पंचायत समिती सभापती पदाकरीता सद्या लागु असलेल्या आरक्षण कालावधी समाप्त झाल्यानंतर लगतच्या दिवसापासुन उर्वरित अडिच वर्ष कालावधी करिता ही आरक्षण सोडत घेणार आहे. ही सभा गुरुवार दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे आयोजित करण्यात आली आहे. या सोडतीच्या सभेत पंचायत समिती निहाय सभापती पदाचे आरक्षण निश्चित करण्यात येणार आहे. सर्व संबंधितांनी या सभेस उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ