उपप्रादेशिक परिवहन कार्यालयात वाचन प्रेरणा दिनानिमित्त मार्गदर्शन

 अकोला,दि.15(जिमाका)- राष्ट्रपती डॉ.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिना निमित्त उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, अकोला येथे आज मराठी भाषा वाचन प्रेरणा दिनाचे आयोजन करण्यात आले. यावेळी डॉ. सुधाकर बंडु मनवर व मेघराज गणेशराव गाडग यांनी वाचन प्रेरणा दिन व मराठी भाषा साहित्या संदर्भात मार्गदर्शन केले.

कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रपती डॉ. अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पअर्पण व दिपप्रज्वलन करुन झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी उपप्रादेशिक परिवहन अधिकारी जयश्री दुतोंडे यांनी सुद्धा मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन वृषाली महल्ले यांनी तर आभार प्रदर्शन सहायक मोटार वाहन निरीक्षण दिनेश मिठाराम एकडे यांनी केले. यावेळी कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी व कार्यालयीन कामकाजासाठी येणारे नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

विधानसभा निवडणूक 2024 - पूर्वपिठीका

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

विधानसभा निवडणूकीसाठी 70 उमेदवारांचे अर्ज कायम