महाराष्ट्र लोकसेवा आयोग दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब संयुक्त पूर्व परीक्षा सुरळीत; जिल्ह्यात 6712 उमेदवारांची उपस्थिती







 

अकोला, दि.8(जिमाका)- महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग दुय्यम सेवा अरापत्रित गट ब संयुक्त (पूर्व) परीक्षा- 2022 ही परीक्षा जिल्ह्यातील एकुण 31 उपकेंद्रावर घेण्‍यात आली. या एकूण 31 उपकेंद्रावर 8455 परीक्षार्थींचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी 6712 उमेदवार परीक्षेस उपस्थित होते. तर 1743 उमेदवार अनुपस्थित होते.

             या परीक्षेकरीता जिल्‍हाधिकारी निमा अरोरा यांच्या  मार्गदर्शनाखाली निवासी उपजिल्‍हाधिकारी संजय खडसे यांनी परीक्षा नियंत्रक म्‍हणून काम पाहिले. तसेच परीक्षा सुरळीत व यशस्‍वीपणे पार पाडण्‍याकरीता समन्‍वय अधिकारी म्‍हणुन उपजिल्हाधिकारी भुसंपादन अधिकारी विश्‍वनाथ घुगे, उपजिल्‍हाधिकारी पुनर्वसन सदाशिव शेलार, उपविभागीय अधिकारी अकोला डॉ. निलेश अपार, सहा. जिल्हा सुचना व विज्ञान अधिकारी अनिल चिंचोले, सहा. संचालक स्थानिक निधी लेखा परिक्षणचे व्ही.ए. जवंजाळ, तहसिलदार अकोला सुनिल पाटील, तहसिलदार तेल्हारा संतोष येवलीकर, नगरपालिका प्रशासन अधिकारी बळवंत अरखराव  यांनी कामकाज केले. परीक्षा केंद्रांवर कायदा व सुव्यवस्था अबाधीत राखण्याच्या दृष्टीने पोलीस विभागाकडून  चोख बंदोबस्त पुरविण्यात आला होता.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ