कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘दोन’ पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज
अकोला दि.26(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 67 अहवाल प्राप्त झाले. त्यात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 2
व
खाजगी 0)2+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह
2.
आरटीपीसीआर ‘दोन’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन महिलांचा समावेश असून हे सर्व रुग्ण अकोला महानगरपालिका क्षेत्रातील
रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून
प्राप्त झाली.
दोन डिस्चार्ज
आज दिवसभरात दोन
रुग्णांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती
जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.
सक्रिय
रुग्ण ‘10’
जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 65973(49840+15142+991)आहे.
सद्यस्थितीत जिल्ह्यात 10 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील दोन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर आठ जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु
आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा