पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा ; शुक्रवारी (दि.१४) होणार १०२४ पदांसाठी भरती प्रक्रिया


अकोला,१२ दि.(जिमाका)-  जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने  शुक्रवार दि.१४ रोजी पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन  जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित करण्यात आले आहे. या मेळाव्यात १०२४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. तरी इच्छुक पात्रताधारकांनी  या मेळाव्यात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी केले आहे.

पंडीत दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन शुक्रवार दि.१४ रोजी सकाळी ११ ते दुपारी ३ या वेळात करण्यात आले असून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात हा मेळावा होणार आहे. या मेळाव्यात जस्ट डायल साठी मार्केटींग एक्झिक्युटीव्ह- पात्रता पदवीधर (२१ ते ३५ वयोमर्यादा) ३० पदे, बीव्हीजी पुणे साठी- टूल ॲण्ड डाय नेकर ऑपरेटर (६० पदे), सीओटू वेल्डर(१५पदे), फिटर(१५पदे), एक्झिक्युटीव्ह(२० पदे), इलेक्ट्रिशियन(१५पदे) सीएनजी ऑपरेटर(२०पदे),  प्लास्टीक मोल्डिंग ऑपरेटर्स(३० पदे) आयटीआय, डिप्लोमा उत्तीर्ण (१८ ते ४० वयोमर्यादा), महिंद्रा ॲण्ड महिंद्रा औरंगाबाद करीता  प्रशिक्षणार्थी (२५० पदे) १० वी, १२ वी पदवीधर, आयटीआय(१८ ते २८ वयोमर्यादा), बडवे इंजिनिअरींग लि. औरंगाबाद प्रशिक्षणार्थी (२८० पदे) १० वी, १२ वी पदवीधर, आयटीआय (१८ ते २८ वयोमर्यादा), परम स्किल ट्रेनिंग इंडिया प्रा. लि. औरंगाबाद करीता रिक्रुटर्स (१० पदे) कोणत्याही शाखेचा पदवीधर (१८ ते ३० वयोमर्यादा), वायबर्नेट इंटरनेट सर्व्हिसेस प्रा. लि. मार्केटींग एक्झिक्युटिव्ह (१५ पदे) आयटीआय कॉम्प्युटर ट्रेड, कॉम्प्युटर डिप्लोमा(१८ ते ३० वयोमर्यादा), भारतीय जीवन बिमा निगम अकोला  विमाप्रतिनिधी/ सल्लागार (३० पदे) किमान दहावी पास (१८ वर्षे पूर्ण), निर्माण मल्टिस्टेट को. ऑप. क्रेडीट सोसायटी अकोला करीता ब्रॅंच एक्झिक्युटीव्ह/ क्लार्क (२०पदे) कोणत्याही शाखेचा पदवीधर, एमएससीआयटी उत्तीर्ण(१८ ते ४० वयोमर्यादा), क्रांतीसूर्य महात्मा जोतिबा फुले नागरी सहकारी पतसंस्था मर्या. अकोला करीता शिपाई, बारावी पास (२ पदे), क्लार्क पदवीधर व एमएससीआयटी (२पदे), पिग्मी एजंट किमान १२ वी पास(१० पदे), फ्लिपकार्ट नागपूर करिता सहायक पिकर/ पॅकर(३० पदे) १० व १२ वी पास, पीजी इलेस्टोप्लास्ट अहमदनगर करिता सहायक (१२० पदे) १० वी , १२ वी पास व आयटीआय कोणताही ट्रेड, (१८ ते ३० वयोमर्यादा), सीआरटी औरंगाबाद करीता सहायक (५० पदे) १० वी , १२ वी पास व आयटीआय कोणताही ट्रेड, (१८ ते ३० वयोमर्यादा)

 या प्रमाणे १०२४ पदांसाठी भरती प्रक्रिया राबविली जाणार आहे. इच्छुक पात्र उमेदवारांनी आपल्या बायोडाटा, शैक्षणिक कागदपत्रे, आधारकार्ड, पासपोर्ट फोटो सह स्वखर्चाने उपस्थित रहावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्र अकोला या कार्यालयाच्या दूरध्वनी क्रमांक ०७२४-२४३३८४९ व भ्रमणध्वनी क्रमांक ९६६५७७५७७८ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ