कोविडःआरटीपीसीआर चाचण्यांत पाच पॉझिटीव्ह, तीन डिस्चार्ज


 अकोला दि.4(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 82 अहवाल प्राप्त झाले. त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आला. तर तीन  जणांला डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 5 व खाजगी 0)5+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 5.

आरटीपीसीआर ‘पाच’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अहवालात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात दोन पुरुष व तीन महिलांचा समावेश असून हे  रुग्ण मुर्तिजापूर व अकोला मनपा क्षेत्रातील प्रत्येकी दोन तर बार्शीटाकळी येथील एक रहिवासी आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

तीन डिस्चार्ज

आज दिवसभरात तीन जणांला डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

 

सक्रिय रुग्ण ‘28’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65937(49804+15142+991) आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 28 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील 10 रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 18 जणांना होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

                                                              000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना