सरदार वल्लभभाई पटेल जयंतीनिमित्त आयोजित राष्ट्रीय एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद











अकोला, दि.३१ (जिमाका)-   जिल्हा प्रशासन,  जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी  यांच्या संयुक्त विद्यमाने सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त आज राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले. या राष्ट्रीय एकता दौडला युवक युवती व नागरीकांचा उत्‍स्फुर्त प्रतिसाद मिळाला.

राष्ट्रीय एकात्मता आणि सामाजिक ऐक्याचा संदेश देण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात येते. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्य हस्ते हिरवी झेंडी दाखवून दौडचा प्रारंभ करण्यात आला. जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्प्लवार, क्रीडा प्रबोधनीचे प्राचार्य सतिशचंद्र भट, मनपाचे नगर सचिव अनिल बिडवे, नेहरु युवा केंद्राचे कार्यक्रम पर्यवेक्षक उदय देशमुख, क्रीडा अधिकारी मनिषा ठाकरे तसेच विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जिल्हा क्रीडा संकुल वसंत देसाई स्टेडियम येथून या दौडला सुरुवात झाली तेथून अग्रसेन चौक मार्गे प्रमुख मार्गांवरुन वसंत देसाई स्टेडियम येथे समारोप करण्यात आला. या दौडमध्ये अधिकारी कर्मचारी स्थानिक विद्यालय, शारिरीक शिक्षण शिक्षक, विविध संघटनेचे पदाधिकारी, पोलीस भरती प्रशिक्षणाकरीता येणारे युवक युवती, खेळाडू, नागरिक सहभागी झाले.  निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांनी राष्ट्रीय एकता दिवसाची उपस्थितांना शपथ दिली. प्रास्ताविक जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्प्लवार यांनी सुत्रसंचालन क्रिडा प्रबोधनीचे प्राचार्य सतिशचंद्र भट यांनी केले. तसेच प्रशांत खापरकर, राजू उगवेकर, निशांत वानखडे, अजिंक्य धेवडे, गजानन चाटसे यांनी परिश्रम घेतले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ