कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘एक’ पॉझिटीव्ह, दोघांना डिस्चार्ज
अकोला दि.20(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग
तपासणीचे (आरटीपीसीआर) 59 अहवाल प्राप्त झाले. त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 1व खाजगी 0)1+रॅपिड ॲन्टीजेन
चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 1.
आरटीपीसीआर ‘एक’
आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात एकाचा अहवाल
पॉझिटीव्ह
आला. त्यात एका महिला रुग्ण असून अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहे,
अशी
माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.
दोघांना डिस्चार्ज
आज दिवसभरात दोघा रुग्णांना डिस्चार्ज
देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून
देण्यात आली.
सक्रिय
रुग्ण ‘14’
जिल्ह्यात एकूण
पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65964(49831+15142+991)आहे. सद्यस्थितीत
जिल्ह्यात 14 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील तीन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 11 जणांवर होम आयसोलेशन
मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा
रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा