जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयाची संगणक खरेदी, दरपत्रके मागविली


अकोला, दि.13(जिमाका)- येथील जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या कार्यालयात कार्यालयीन कामकाजासाठी संगणक प्रिंटर इ.साहित्य खरेदी करावयाचे असुन त्यासाठी पुरवठादारांकडून दरपत्रके मागवण्यात आली आहेत, असे संशोधन अधिकारी दीपा हेरोळे यांनी कळविले आहे.

आवश्यक सामुग्रीचे विवरण : डेल डेस्कटॉप, मॉनिटर व कीबोर्ड माऊसचे 2 नग, कॅनान प्रिन्टरचे 5 नग तर एचपी प्रिन्टर ऑल इन वनचे  एक नग साहित्य.

अटी शर्ती याप्रमाणे : वस्तुच्या किंमती सर्व करासहीत सादर करावे, मंजुर दराव्यतिरिक्त इतर कोणतीही रक्कम आपणास अदा करण्यात येणार नाही, पुरवठा करावयाचे संगणक व प्रिंटर नविन सुस्थितीत व चालु ‍स्थितीमध्ये असणे बंधनकारक आहे, पुरवठा केलेल्या साहीत्याचे देयक दोन प्रतीत या कार्यालयास सादर करावे.  मंजुर केलेली रक्कम अदा करण्यास अनुदान अभावी विलंब झाल्यास व्याजाची मागणी करता येणार नाही, संगणक  व प्रिंटर खरेदीनंतर तीन वर्षाच्या कालावधीदरम्यान त्यामध्ये बिघाड आल्यास संगणक व प्रिंटर दुरुस्तीची जबाबदारी पुरवठाधारकांची असेल. पुरवठा धारकांकडून पुरविण्यात येणारे संगणक सॉलीड स्टेट ड्राईव्हसह असणे बंधनकारक आहे. निविदा रद्द करण्याचे किंवा स्थगित करण्याचे अधिकारी उपायुक्त तथा सदस्य यांचेकडे राखुन ठेवण्यात येत आहेत. संगणक व प्रिंटरसाठी वेगवेगळया निविदा सादर करणे आवश्यक राहिल, असे कळविण्यात आले आहे.

000000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ