शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांचे प्रश्नमंजूषा स्पर्धेत यश

 अकोला,दि.१८(जिमाका)- शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय अकोला येथील अंतिम वर्ष एम.बी.बी.एस. पार्ट १ च्या विद्यार्थ्यांच्या संघाने नागपूर येथे पार पडलेल्या विदर्भस्तरीय आंतर महाविद्यालयीन प्रश्नमंजूषा २०२२ या स्पर्धेत द्वितीय क्रमांक पटकावला. या स्पर्धेत महाविद्यालयातील ११ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. त्यात मित कोठारी, रचिता भोवाल, सुमंत वारोकार या विद्यार्थ्यांनी यश संपादन केले. या विद्यार्थ्यांना डॉ. राजेश्री चौरपगार, डॉ. पराग डोईफोडे, डॉ. भाग्यश्री चिपळूणकर व अधिष्ठाता डॉ. मिनाक्षी गजभिये यांचे मार्गदर्शन लाभले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ अनुसूचित जातींसाठी विविध कर्ज योजना