राष्ट्रीय एकता दौडमध्ये सहभागी व्हा; वसंत देसाई स्टेडियम येथे सोमवारी(दि.31) आयोजन

 अकोला, दि.30 (जिमाका)-   क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य व केंद्र शासनाच्या विद्यमाने   सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त सोमवारी दि.31 रोजी स्व. वसंत देसाई स्टेडियम, अकोला येथे सकाळी साडेसात वाजता राष्ट्रीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले आहे. या एकता दौडमध्ये  अकोला शहर व जिल्ह्यातील  अधिकारी कर्मचारी स्थानिक विद्यालय  व महाविद्यालयातील स्काऊट , गाईड, एन.सी.सी. व एन.एस.एस पथकातील विद्यार्थी , शारीरीक शिक्षण शिक्षक , विविध संघटनेचे पदाधिकारी, युवक-युवती, खेळाडू, नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रकांत उप्प्लवार यांनी केले.

00000

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ