कोविडःआरटीपीसीआर चाचणी ‘तीन’ पॉझिटीव्ह, तिघांना डिस्चार्ज


 अकोला दि.21(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 53 अहवाल प्राप्त झाले. त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. तर तिघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर(शा.वै.म. 3 व खाजगी 0)3+रॅपिड ॲन्टीजेन चाचणी 0=एकूण पॉझिटीव्ह 3.

आरटीपीसीआर ‘तीन’

आज दिवसभरात आरटीपीसीआर चाचण्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व दोन पुरुषांचा समावेश असून सर्व रुग्ण अकोला मनपा हद्दीतील रहिवासी आहे, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त झाली.

तिघांना डिस्चार्ज

आज दिवसभरात तीन रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सक्रिय रुग्ण ‘14’

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 65967(49834+15142+991)आहे. सद्यस्थितीत जिल्ह्यात 14 सक्रिय पॉझिटीव्ह रुग्ण आहेत, यातील तीन रुग्ण उपचारासाठी दाखल आहेत तर 11 जणांवर होम आयसोलेशन मध्ये उपचार सुरु आहेत, अशी माहिती  जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ