पंचायत समिती सभापती पदाची आरक्षण जाहिर







अकोला, दि.13(जिमाका)- अकोला जिल्हा परिषद अंतर्गत असलेल्या पंचायत समिती सभापती पदाच्या आरक्षण सोडत आज जाहिर झाले. ते याप्रमाणे : पंचायत समिती मुर्तीजापूर अनुसूचित जाती प्रवर्गाकरीता, तेल्हारा अनुसूचित जाती महिला, अकोला अनुसूचित जमाती महिला, पातूर नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला, बाळापूर सर्वसाधारण, तर बार्शीटाकळी  व अकोट सर्वसाधारण महिलाकरीता आरक्षण निश्चित करण्यात आले आहे, असे जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी आदेशाव्दारे कळविले आहे.

पंचायत समिती सभापती पदाचे आरक्षण सोडत नियोजन भवन, जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे पार पडली. यावेळी पंचायत समिती सदस्य, राजकिय पक्षाचे प्रतिनिधी, नागरिक उपस्थित होते.

00000


टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ