म्हातोडी येथे डाक विभागाचा वित्तीय समावेशन मेळावा


अकोला, दि.१२(जिमाका)- अकोला डाक विभागाद्वारे सोमवारी (दि.११) म्हातोडी येथे वित्तीय समावेशन मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.  या मोहिमेत एकूण १६५ जणांनी नवीन डाक बचत खाते व १० जणांनी ग्रामीण डाकजीवन विमा योजनेत सहभाग घेतला.

अध्यक्षस्थानी प्रवर अधिक्षक डाकघर अकोला संजय आखाडे हे होते. तर उपसरपंच म्हातोडी करुणा शिरसाट, तंटामुक्ती अध्यक्ष प्रमोद इंगळे, शाळा समिती अध्यक्ष श्रीकांत बोबडे, रामरतन घावट, विनायक ढेंगे आदी उपस्थित होते.    मेळाव्यात  सहाय्यक अधिक्षक सुनील हिवराळे ,  एस एस नानीर, वी.के मानकर, एन एस बावस्कर यांनी उपस्थित सर्व नागरिकांना डाक विभाग मध्ये गुंतवणुकीचे महत्व पटवून दिले. सूत्र संचलन सचिन नेस्नेस्कर यांनी तर आभार प्रदर्शन नीलकंठ बावस्कर  यांनी केले. शिवाजी पार्क उपडाकघर अंतर्गत ग्रामीण डाक सेवक तसेच मध्य उपडाक विभागातील सर्व कर्मचारी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.त्यानंतर अकोला डाक विभागाचे उपस्थित सर्व कर्मचाऱ्यांनी म्हातोडी गावामध्ये घरोघरी जाऊन गावकऱ्यांना बचतीचे महत्व पटवून सांगितले या मोहिमेत एकूण १६५ जणांनी नवीन डाक बचत खाते व १० जणांनी ग्रामीण डाकजीवन विमा योजनेत सहभाग घेतला. यामेळाव्यास म्हातोडी, कासली बु, घुसर,कासली खुर्द येथील बहुसंख्य नागरिक उपस्थित होते.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ