जिल्हाधिकारी कार्यालयात ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ आणि ‘राष्ट्रीय एकता दिवस’ साजरा










अकोला,दि.३१(जिमाका)- देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती ‘राष्ट्रीय एकता दिवस’ व देशाच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी  यांची पुण्यतिथी ‘राष्ट्रीय संकल्प दिवस’ म्हणून जिल्हाधिकारी कार्यालयात साजरा करण्यात आला.

      येथील लोकशाही सभागृहात हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे यांच्या हस्ते इंदिरा गांधी आणि सरदार वल्लभभाई पटेल यांच्या प्रतिमांना माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आले. उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे, बाबासाहेब गाढवे,सदाशिव शेलार यांच्यासह अन्य अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.      उपजिल्हाधिकारी गजानन सुरंजे यांनी यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली.

००००० 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ