पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांचा जिल्हा दौरा

 अकोला, दि. २८ (जिमाका)- राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास, शालेय शिक्षण, महिला व बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ना.ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू हे गुरुवार दि. २९ रोजी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा जिल्हा दौरा कार्यक्रम याप्रमाणे-

गुरुवार दि.२९ रोजी सकाळी नऊ वाजता कुरळपूर्णा ता. अचलपूर जि. अमरावती येथून अंजनगाव पणज मार्गे आसेगाव बाजार ता. अकोट कडे प्रयाण, सकाळी साडेदहा वा. आसेगाव बाजार ता. अकोट येथे पूरग्रस्तांना जीवनावश्यक वस्तू किट वाटप  कार्यक्रमास उपस्थिती,  सकाळी साडेअकरा वा. आसेगाव बाजार येथून मौजे पनोरी  ता. अकोट कडे प्रयाण, दुपारी १२ वा.  मौजे पनोरी  येथे स्व. मुरलीधर आनंदा बुटे यांच्या परिवारास सांत्वनपर भेट व सानुग्रह अनुदान  धनादेश वाटप, दुपारी साडेबारा वा. ग्रा.पं. तरोडा ता. अकोट येथे ग्रामपंचायत सभागृह भुमिपूजन,  दुपारी एक वा.  लोतखेड ता. अकोट कडे प्रयाण, दुपारी दीड वा. ग्रा.पं. लोतखेड येथे ग्रामपंचायत भवन इमारत व  व्यायामशाळा लोकार्पण कार्यक्रमास उपस्थिती. दुपारी अडीच वा. कुरळपूर्णा ता. अचलपूर जि. अमरावतीकडे रवाना.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ