जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस ‘एनएबीएल’ प्रमाणपत्र

 



अकोला,दि.१५(जिमाका)- जिल्ह्यात जलस्वराज्य प्रकल्पांतर्गत उभारण्यात आलेल्या जिल्हा पाणी तपासणी प्रयोगशाळेस एनएबीएलचे (NABL:National Accridation Board For Testing And Calibaration Of Labrotory) प्रमाणपत्र  मिळाले आहे, अशी माहिती वरीष्ठ भूवैज्ञानिक प्रवीण बर्डे यांनी दिली आहे.

पाणी गुणवत्ता  संनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाअंतर्गत पाणी तपासणीसाठी प्रयोगशाळांची उभारणी करुन जिल्ह्यात ग्रामीण भागात पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांच्या नमुन्यांची तपासणी करुन रासायनिक व जीवाणू विषयक तपासण्या या प्रयोगशाळेत केल्या जातात. त्यात रासायनिक पृथ्थकरण विषयक सात निकषांची पुर्तता केल्याने या प्रयोगशाळेस हे प्रमाण पत्र मिळाले आहे. या प्रयोगशाळेत पाण्याची विद्युत प्रवाहितता, फ्लोराईड,  लोह, नायट्रेट, सामू, एकूण विरघळलेले घटक, एकूण काठीण्यता (चुनखडीचे प्रमाण) या सात घटकांची तपासणी केली जाते. त्यासाठी या प्रयोगशाळेस हे प्रमाणपत्र मिळाले आहे. आगामी काळात अशाच प्रयोगशाळा मुर्तिजापूर, तेल्हारा व बार्शी टाकळी येथेही उभारण्यात येणार आहेत,असेही बर्डे यांनी सांगितले. या प्रयोगशाळेत ग्रामीण भागात जलसुरक्षक विविध ठिकाणच्या पाण्याचे स्त्रोतांमधून पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविले जातात व त्याचे रासायनिक व जीवाणू विषयक तपासण्या केल्या जातात.

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ