रेडक्रॉसतर्फे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरण: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने विभागात ऑक्सिजन वितरणाचे परिपूर्ण नियोजन -विभागीय आयुक्त पियुष सिंह

 






अकोला,दि.३०(जिमाका)-अमरावती विभागाच्या पाचही जिल्ह्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या नियोजनात ऑक्सिजन वितरणाचे नियोजन करण्यात आले आहे. रेडक्रॉस सारख्या सेवाभावी संस्थांनी दिलेल्या योगदानामुळे या नियोजनाला अधिक बळकटी येईल,असे प्रतिपादन अमरावती विभागाचे विभागीय आयुक्त पियुष सिंह यांनी आज येथे केले.

इंडीयन रॅडक्रॉस सोसायटीच्या अकोला शाखेतर्फे  ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरीत करण्यात आले. जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात हा कार्यक्रम  पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी निमा अरोरा, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सौरभ कटीयार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, रेडक्रॉस अकोला शाखेचे उपाध्यक्ष डॉ. किशोर मालोकार, कोषाध्यक्ष ॲड. महेंद्र साहू,  ॲड. सुभाषसिंग ठाकूर, ॲड. सुभाष मुंगी,  मनोज चांडक, अमर गौड, पंकज पाटील, सचिव प्रभजितसिंग बछेर आदी उपस्थित होते.

 यावेळी सर्पमित्र बाळ काळणे यांना सहयोग निधी  तसेच बी.एस. देशमुख यांना गौरवपत्र प्रदान करण्यात आले. तसेच प्राथमिक आरोग्य केंद्र तेल्हारा, अकोट, आबाजी थत्ते रुग्णोपयोगी साहित्य केंद्र यांना दोन, पूज्य सिंधी पंचायत यांना दोन, गुरुद्वारा गुरुसिंग सभा अकोला यांना दोन या प्रमाणे ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वितरीत करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रभजितसिंग बछेर तर आभार प्रदर्शन डॉ. किशोर मालोकार यांनी केले.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ