प्राधान्य व अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी ऑगस्ट महिन्याचा नियतन मंजुर
अकोला,दि.20 (जिमाका)- जिल्ह्यातील अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंबातील लाभार्थ्यांसाठी माहे ऑगस्ट करिता गहु व तांदुळाचे मासिक नियतन मंजुर झाले आहे. त्यात प्राधान्य गटातील 10 लक्ष 99 हजार 602 लाभार्थ्यांना गहुचे 32 हजार 990 क्विंटल व तांदुळाचे 21 हजार 990 क्विंटल मंजूर नियतन झाले आहे. तर अंत्योद्य लाभार्थ्यांसाठी 45 हजार 278 करिता गहुचे 6 हजार 790 क्विंटल व तांदुळचे 9 हजार 60 क्विंटल मंजूर नियतन झाले असल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यु.काळे यांनी दिली आहे.
प्राधान्य गटाकरीता
अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 96 हजार 439 लाभार्थ्यांना गहुचा 5893
क्वि. तर तांदुळाचा 3929 क्वि., अकोला ग्रामीण शासकीय धान्य गोदाम येथे 2 लक्ष 7 हजार 321
लाभार्थ्यांना गहुचा 6220 क्वि. तर तांदुळाचा 4146 क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय
धान्य गोदाम येथे 1 लक्ष 7 हजार 751 लाभार्थ्यांना गहुचा 3233 क्वि. तर तांदुळाचा
2155 क्वि., अकोट येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 34 हजार 342
लाभार्थ्यांना गहुचा 4030 क्वि. तर तांदुळाचा 2687 क्वि., तेल्हारा येथील शासकीय
धान्य गोदाम येथे 1 लक्ष 10 हजार 510 लाभार्थ्यांना गहुचा 3316 क्वि. तर तांदुळाचा
2210 क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 35 हजार 434
लाभार्थ्यांना गहुचा 4063 क्वि. तर तांदुळाचा 2708 क्वि., पातूर येथील शासकीय
धान्य गोदाम येथे 92 हजार 220 लाभार्थ्यांना गहुचा 2767 क्वि. तर तांदुळाचा 1844 क्वि.
व मुर्तिजापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 1 लक्ष 15 हजार 585 लाभार्थ्यांना
गहुचा 3468 क्वि. तर तांदुळाचा 2311 क्वि., असे एकूण 10 लक्ष 99 हजार 602
लाभार्थ्यांना गहूचे 32990 क्विंटल तर तांदुळाचे 21990 क्विंटल मंजुर नियतन झाला
आहे.
अंत्यादय
लाभार्थ्यांसाठी अकोला शहरातील शासकीय धान्य गोदाम येथे 1320 लाभार्थ्यांना गहुचा 198
क्वि. तर तांदुळाचा 264 क्वि., अकोला ग्रामीण शासकीय धान्य गोदाम येथे 7114 लाभार्थ्यांना
गहुचा 1067 क्वि. तर तांदुळाचा 1424 क्वि., बार्शीटाकळी येथील शासकीय धान्य गोदाम
येथे 6964 लाभार्थ्यांना गहुचा 1045 क्वि. तर तांदुळाचा 1394 क्वि., अकोट येथील शासकीय
धान्य गोदाम येथे 6947 लाभार्थ्यांना गहुचा 1042 क्वि. तर तांदुळाचा 1390 क्वि.,
तेल्हारा येथील शासकीय धान्य गोदाम येथे 6419 लाभार्थ्यांना गहुचा 962 क्वि. तर
तांदुळाचा 1284 क्वि., बाळापूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे 5450 लाभार्थ्यांना
गहुचा 817 क्वि. तर तांदुळाचा 1090 क्वि., पातूर येथील शासकीय धान्य गोदाम येथे
4755 लाभार्थ्यांना गहुचा 713 क्वि. तर तांदुळाचा 952 क्वि. व मुर्तिजापूर येथील शासकीय
धान्य गोदाम येथे 6309 लाभार्थ्यांना गहुचा 946 क्वि. तर तांदुळाचा 1262 क्वि.,
असे एकूण 45 हजार 278 लाभार्थ्यांना गहूचे 6790 क्विंटल तर तांदुळाचे 9060 क्विंटल
मंजुर नियतन झाला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा