रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 819 चाचण्यात चार पॉझिटीव्ह
अकोला,दि.6(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी
जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.5) दिवसभरात झालेल्या चाचण्या झाल्या त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात
आली.
काल
दिवसभरात तेल्हारा येथील 12 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अकोला आयएमए येथे आठ चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, वैद्यकीय महाविद्यालय येथे 55 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हेगडेवार लॅब येथे 13 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे 11, अकोट येथे सात, बाळापूर येथे 49, बार्शीटाकळी
येथे एक, मुर्तिजापूर येथे 102, अकोला महानगरपालिका येथे 519, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 42 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही
अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 819 जणांच्या चाचण्या होऊन त्यात चार जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 90 हजार
006 चाचण्या झाल्या पैकी 14429 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी
माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
000000
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा