५३८ अहवाल प्राप्त, सहा पॉझिटीव्ह, सहा डिस्चार्ज, एक मृत्यू

  अकोला,दि.१६(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) ५३८ अहवाल प्राप्त झाले. त्यातील ५३२  अहवाल निगेटीव्ह तर सहा अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, तर एका रुग्णाचा मृत्यू झाला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.१५) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये एकही  अहवाल पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57717(43139+14401+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह-आरटीपीसीआर सहा + रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शून्य = एकूण पॉझिटीव्ह सहा.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण ३००४४४ नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे २९६९१७ फेरतपासणीचे ३९७ तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे ३१३० नमुने होते. आजपर्यंत एकूण ३००४१८ अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या २५७२७९ आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

सहा पॉझिटीव्ह

आज  दिवसभरात  सहा जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व पाच पुरुषाचा समावेश आहे.  त्यात बार्शीटाकळी-एक, अकोला मनपा क्षेत्र-पाच, याप्रमाणे रहिवासी आहेत, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

एक मृत्यू

दरम्यान आज एकाचा मृत्यू झाला. हा रुग्ण वाशिंबा बोरगाव मंजू येथील ५४ वर्षीय पुरुष असून या रुग्णास दि. १५ जुलै रोजी दाखल केले होते, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली.

सहा जणांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील तीन, होम आयसोलेशन मधील तीन  असे एकूण सहा जणांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

४७ जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57717(43139+14401+177) आहे. त्यात ११३३ मृत झाले आहेत. तर ५६५३७ जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत ४७ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ