रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 414 चाचण्यात एक पॉझिटीव्ह


अकोला,दि.19(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.18) दिवसभरात झालेल्या 414 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

काल दिवसभरात अकोला येथे 20, मूर्तिजापूर येथे तीन, अकोला महानगरपालिका येथे 342, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 15,  वैद्यकीय महाविद्यालय येथे 22, चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, तर हेगडेवार येथे 12 चाचण्या झाल्या त्यात एकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला, असे 414 जणांच्या चाचण्या होऊन त्यात एकाचा अहवाल पॉझिटीव्ह आला. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 98 हजार 098 चाचण्या झाल्या पैकी 14462 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.

०००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष (२०२३) निमित्त विशेष लेख ; पौष्टिक तृणधान्य…काळाची गरज

स्वातंत्र्य सैनिकाची माहिती सादर करा

अन्न भेसळ