668 अहवाल प्राप्त, दोन पॉझिटीव्ह, आठ डिस्चार्ज
अकोला,दि.10(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच
वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 668 अहवाल प्राप्त झाले. त्यातील
666 अहवाल निगेटीव्ह तर दोन जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. दरम्यान आठ जणांना डिस्चार्ज
देण्यात आला,असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात
आले आहे.
त्याच प्रमाणे काल (दि.9) रॅपिड
ॲटीजेन टेस्ट मध्ये सात जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह
अहवालांची एकूण संख्या 57681(43118+14386+177)झाली आहे, अशी माहिती शासकीय
वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.
आजचे
एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी सात = एकूण पॉझिटीव्ह नऊ.
शासकीय
वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 297595 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 294074 फेरतपासणीचे
397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3124 नमुने होते. आजपर्यंत एकूण 297496 अहवाल
प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 254378 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय
सूत्रांनी दिली आहे.
दोन पॉझिटिव्ह
आज दिवसभरात दोन जणांचा अहवाल
पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुषांचा समावेश आहे.
त्यात तालुकानिहाय संख्या याप्रमाणे- अकोट- एक, अकोला मनपा क्षेत्र-एक, दरम्यान काल (दि.9) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांत सात
जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही
समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.
आठ जणांना डिस्चार्ज
दरम्यान
आज दुपारनंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथील चार, गोयंका गर्ल्स हॉस्टेल येथील दोन, अवघते हॉस्पिटल येथील एक, बिहाडे हॉस्पिटल येथील एक, असे एकूण आठ जणांना डिस्चार्ज देण्यात आला,अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
44 जणांवर उपचार सुरु
जिल्ह्यात
एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57681(43118+14386+177) आहे.
त्यात 1130 मृत झाले आहेत. तर 56507 जणांना
डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 44 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय
महाविद्यालयातून देण्यात आली आहे.
००००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा