रॅपिड ॲन्टीजेन चाचण्याः 501 चाचण्यात पाच पॉझिटीव्ह
अकोला,दि.11(जिमाका)- कोरोना संसर्ग चाचणीसाठी जिल्ह्यात रॅपिड ॲन्टीजन टेस्ट राबविण्यात येत आहे. यात काल (दि.10) दिवसभरात झालेल्या 501 चाचण्या झाल्या त्यात पाच जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.
काल दिवसभरात मूर्तिजापूर येथे 26 चाचण्या झाल्या त्यात तिघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, हेगडेवार येथे 10 चाचण्या झाल्या त्यात दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला, तर अकोला येथे पाच, अकोट येथे 13, बाळापूर येथे 11, बार्शीटाकली येथे चार, तेल्हारा येथे सात, अकोला महानगरपालिका येथे 364, अकोला आयएमए येथे तीन, आरोग्य कर्मचाऱ्यांचे 34, वैद्यकीय महाविद्यालय येथे 24 चाचण्या झाल्या त्यात कोणाचाही अहवाल पॉझिटीव्ह आला नाही, असे 501 जणांच्या चाचण्या होऊन त्यात पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले. आतापर्यंत जिल्ह्यात एक लक्ष 93 हजार 623 चाचण्या झाल्या पैकी 14451 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली आहे.
०००००
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा