191 अहवाल प्राप्त, दोन पॉझिटीव्ह, दोन डिस्चार्ज

 


 अकोला,दि.18(जिमाका)- आज दिवसभरात शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेतून (सायंकाळी पाच वाजेपर्यंत) कोरोना संसर्ग तपासणीचे (आरटीपीसीआर) 191 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 189 अहवाल निगेटीव्ह तर दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. दरम्यान दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, असे जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.

त्याच प्रमाणे काल (दि.17) रॅपिड ॲटीजेन टेस्ट मध्ये शुन्य जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यामुळे आता एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57719(43141+14401+177) झाली आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

आजचे एकूण पॉझिटीव्ह- आरटीपीसीआर दोन+ रॅपिड ॲन्टीजेन चाचणी शुन्य = एकूण पॉझिटीव्ह दोन.

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाकडून प्राप्त माहितीनुसार, आजपर्यंत एकूण 301095 नमुने तपासण्यात आले. त्यात प्राथमिक तपासणीचे 297559 फेरतपासणीचे 397 तर वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे 3139 नमुने होते. आजपर्यंत एकूण 301047 अहवाल प्राप्त झाले आहेत. एकूण निगेटीव्ह अहवालांची संख्या 257906 आहे, अशी माहिती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा रुग्णालय सूत्रांनी दिली आहे.

दोन पॉझिटिव्ह

आज  दिवसभरात दोन जणांचा अहवाल पॉझिटीव्ह आला. त्यात एक महिला व एक पुरुषांचा समावेश आहे. त्यात अकोला ग्रामीण व अकोला मनपा क्षेत्र येथील प्रत्येकी एक, दरम्यान काल (दि.17) रॅपिड ॲन्टीजेन चाचण्यांत शुन्य अहवाल पॉझिटीव्ह आला आहे, त्यांचाही समावेश आजच्या एकुण पॉझिटीव्ह व ॲक्टीव्ह रुग्ण संख़्येत करण्यात आला आहे, याची नोंद घ्यावी.

दोघांना डिस्चार्ज

दरम्यान आज दुपारनंतर बिहाडे हॉस्पीटल येथील एक, आयकॉन हॉस्पीटल येथील एक, असे दोघांना डिस्चार्ज देण्यात आला, अशी माहिती जिल्हा रुग्णालयातून देण्यात आली.

45 जणांवर उपचार सुरु

जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह अहवालांची एकूण संख्या 57719(43141+14401+177) आहे. त्यात  1133 मृत झाले आहेत. तर 56541 जणांना डिस्चार्ज देण्यात आला असून सद्यस्थितीत 45 जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा रुग्णालय व शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून देण्यात आली आहे.

                                                                        ००००००

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

स्व. यशवंतराव चव्हाण राज्य वाङ्‌मय पुरस्कार प्रवेशिका व पुस्तके पाठविण्याचा कालावधी १ जानेवारी ते ३० जानेवारी २०२६

आदर्श आचारसंहिता निवडणूक आचार संहिता म्हणजे काय ?

आदिवासी विकास योजनांसाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन